Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

वाहतूक आणि डिलिव्हरीचे भविष्य घडवणे

Uber सह ऑटोनॉमस मोबिलिटी आणि डिलिव्हरी

जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे करण्याच्या पद्धतींची नव्याने कल्पना करणे हे Uber चे ध्येय आहे आणि स्वायत्त वाहने ही त्या पुनर्कल्पनेचा एक भाग आहेत.

डिलिव्हरीज मिळवण्याचा किंवा प्रवास करण्याचा सर्वात नाविन्यपूर्ण मार्ग आता Uber नेटवर्कवरील आमच्या विश्वासू भागीदारांच्या स्वायत्त वाहनांसह शक्य आहे.

वैयक्तिक कार आवश्यक नाही

ड्रायव्हर्स आणि कुरिअर्सच्या बरोबरीने Uber प्लॅटफॉर्मवर ऑटोनॉमस मोबिलिटी आणि डिलिव्हरी पर्याय जोडल्याने अधिक लोकांना त्यांची स्वतःची कार न वापरता, त्यांना हवे तिकडे विश्वासार्हपणे आणि सहजतेने जाणे आणि मागणीनुसार त्यांना हवे ते मिळवणे सोपे होईल.

आम्ही आत्तापर्यंत संपादन केलेले यश

Uber आता फेअरफॅक्स, व्हर्जिनिया, मियामी, लॉस एंजेलिस आणि माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथे स्वायत्त डिलिव्हरीची चाचणी करत आहे, जेथे संपूर्ण-इलेक्ट्रिक फूटपाथ रोबोट्स आणि स्वायत्त कार्स समुदायापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवत आहेत.

आम्ही लास वेगासमध्ये सार्वजनिक सेवा देखील चालवत आहोत, जिथे Uber ग्राहक संपूर्ण-इलेक्ट्रिक स्वायत्त वाहनात राईड घेऊ शकतात.

आणि यात आणखी बरीच भर पडणार आहे: आम्ही Uber च्या सामर्थ्याने ग्राहकांसाठी सर्वत्र स्वायत्त मोबिलिटी, डिलिव्हरी आणि मालवाहतूक उपाय राबवण्यासाठी भागीदारी करत आहोत.

आमच्या ऑटोनॉमस भागीदारांना जाणून घ्या

हे सत्यात उतरविण्यासाठी, आम्ही आमच्यासारखीच मूल्ये असलेल्या भागीदारांसह काम करत आहोत:

  • समुदायांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी जेथे आणि जेव्हा सर्वात योग्य असेल तेथे स्वायत्त तंत्रज्ञानाचा वापर करणे
  • आमच्या ग्राहकांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेच्या अधिकारांचा आदर करणे
  • रस्त्यावरील प्रत्येकाच्या सुरक्षिततेची कदर करणे
  • कुठेही जाण्याचे आणि काहीही मिळवण्याचे नवे मार्ग अनलॉक करणे
  • वेमो

    Uber आणि वेमो ने Uber प्लॅटफॉर्मद्वारे अधिक लोकांना वेमो ड्रायव्हर उपलब्ध करून देण्यासाठी बहु-वर्षीय धोरणात्मक भागीदारीची घोषणा अलीकडेच केली आहे.

    ॲरिझोनाच्या फिनिक्स, स्कॉट्सडेल, टेम्पे, मेसा आणि चॅंडलर भागात वेमोच्या सतत विस्तारत जाणाऱ्या प्रदेशात लवकरच तुम्हाला वेमो वाहने प्रवाशांना पिकअप करताना आणि Uber Eats ऑर्डर्स डिलिव्हर करताना आढळतील.

  • ऑरोरा

    अरोरा मालवाहतूक करणाऱ्या सेमीट्रक्सपासून प्रवासी राईडशेअर वाहनांपर्यंत अनेक प्रकारची वाहने चालवण्यासाठी डिझाइन केलेले ड्रायव्हर-सेवा म्हणून स्वायत्त उत्पादन विकसित करत आहे. सध्या, अरोरा ड्रायव्हर चालवत असलेले ट्रक्स टेक्सासमध्ये Uber Freight साठी लोडची वाहतूक करत आहेत.

  • कार्टकेन

    कार्टकेन ही एआय-पॉवर्ड रोबोटिक्स कंपनी आहे जी फूटपाथ डिलिव्हरी रोबोट्स बनवते जे सध्या जवळपासच्या क्षेत्रात खाद्यपदार्थ/किराणा डिलिव्हरी, कॅम्पस मील डिलिव्हरी आणि कर्बसाइड पिकअपसाठी वापरले जातात. ते आता मियामी, फ्लोरिडा आणि फेअरफॅक्स, व्हर्जिनिया येथील Uber Eats ग्राहकांना डिलिव्हरी करत आहेत.

  • मोशनल

    Uber आणि मोशनल यांच्यात 10 वर्षांचा मल्टीमार्केट फ्रेमवर्क करार आहे ज्यामुळे मोठ्या राईडशेअर नेटवर्कवर सर्वात मोठ्या उपयोजनांपैकी एक असलेली स्वायत्त वाहनांची (AVs) उपयोजना तयार होईल असे अपेक्षित आहे.

    तुम्हाला मोशनल ची वाहने लास वेगास, नेवाडा येथे प्रवाशांना पिकअप करताना आणि सांता मोनिका, कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर Uber Eats ऑर्डर्स डिलिव्हर करताना दिसतील.

  • नुरो

    नुरो ऑन-रोड इलेक्ट्रिक स्वायत्त वाहने तयार करते जी थेट तुमच्या दारापर्यंत वस्तू पोहोचविण्यास डिझाइन करण्यात आली आहेत. नुरो आता पूर्णपणे कार्यरत आहे आणि माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्नियामध्ये Uber सोबत डिलिव्हरी करण्यास सज्ज आहे.

  • सर्व्ह रोबोटिक्स

    सर्व्ह रोबोटिक्सचे मैत्रीपूर्ण फुटपाथ रोबोट्स ग्राहकांना सुलभ हँडऑफसह कमी-अंतराच्या डिलिव्हरीज देतात. ते आता वेस्ट हॉलीवूड, कॅलिफोर्नियामध्ये डिलिव्हरीज करत आहेत.

1/6

सुरक्षा आणि शाश्वततेबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेबद्दल अधिक

  • तुमच्या सुरक्षेबद्दल आमची वचनबद्धता

    आम्ही दररोज जगभरातील लाखो लोकांना भेटत असल्यामुळे, आम्ही सुरक्षा स्थापित करण्यासाठी बचनबद्ध आहोत. प्रवास करताना तुमचे संरक्षण करण्यात मदत करणारी आमची वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया यांविषयी जाणून घ्या.

  • दिवसाला लाखो राईड्स, शून्य उत्सर्जन

    सार्वजनिक वाहतूक असो किंवा मायक्रोमोबिलिटी, शून्य उत्सर्जन करणार्‍या वाहनांमध्ये 100% राईड्स हे साध्य करून, Uber 2040 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक, शून्य-उत्सर्जन प्लॅटफॉर्म बनण्यासाठी वचनबद्ध आहे.

  • Uber Freight

    पूर्णपणे स्वायत्त आणि कमी ते शून्य उत्सर्जन करणारे ट्रक्स उद्योगाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची एक मोठी संधी प्रदान करतात. Uber Freight नेटवर्कचे प्रमाण हाताळणारी धोरणात्मक भागीदारी करून, आम्ही कार्बन उत्सर्जनवर मात करण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान आणत आहोत.

1/3