वॉशिंग्टन, डीसीमधील पॉप-अप रेस्टॉरंट्स
कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या रेस्टॉरंट्सना त्यांचा व्यवसाय नव्या परिसरांमध्ये विस्तारित करण्यास सक्षम करत आहोत.
Uber Eats चे वॉशिंग्टन, डीसी, युएस, पॉप-अप हे इटओक्रा आणि सूट नेशन, नेव्ही यार्ड भागातील 5,000 चौरस फुटांचा शिपिंग कंटेनर बार आणि इव्हेंट्सचे ठिकाण असलेले सँडलॉट साऊथइस्ट, आणि या पॉप-अपसाठी सल्ला देत असलेले आणि प्रोग्रामिंग करत असलेले आमचे समुदाय भागीदार &Accessयांच्या सहयोगाने कार्यरत आहे.
आम्ही एकत्रितपणे या जागेचे कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या व्यवसायांमधील शेफ्ससाठी भाडे नसलेल्या, तात्पुरत्या जागेत रूपांतर केले, ज्यामध्ये 2 स्वयंपाकघरांना अॅक्सेस आणि बसण्यासाठी बरीच जागा आहे. शेफ्स गुरुवार ते रविवारीपर्यंत निवासी असतात; सोमवार हा समुदायाच्या सेवेचा दिवस आहे. व्यवसाय त्यांचा महसूल स्वत:कडे ठेवतात आणि त्यांना Uber Eats वर ठळकपणे दाखवले जाते, त्यामुळे त्यांची प्रेक्षक आणि ग्राहक संख्या वाढवायला मदत होते.
हा प्रकल्प आम्हाला पारंपरिकपणे विविधतेचा अभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या अनेक रेस्टॉरंट्सचा आणि व्यवसायांचा परिचय करून देण्यासाठी मदत करण्याची संधी देतो; रिव्हरफ्रंट येथे असलेल्या सुमारे 115 व्यवसायांपैकी केवळ सुमारे अर्धा डझन व्यवसाय कृष्णवर्णीयांच्या मालकीचे आहेत. सुरुवातीलाच इतके सारे व्यवसाय सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे, ज्यामध्ये पुडीन (कॅजुन/क्रिओल फूड ट्रक), सिल्व्हर स्प्रिंग विंग्ज आणि फिशस्केल (सीफूड बर्गर बार) यांचा समावेश आहे.
सहभागी असलेल्या व्यवसायांच्या पाककृतींचा ज्यांनी आस्वाद घेतला त्यांना खाद्य पदार्थांसाठी सवलत कोड्स मिळाले. आम्हाला अशी आशा आहे की हा पॉप-अप कृष्णवर्णीय शेफ्सना कॅपिटॉल रिव्हरफ्रंटवर त्यांचे खवय्ये तयार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देईल, जिथून ते या परिसरातील आणखी कायमच्या ठिकाणीही विस्तार करू शकतील.
हा प्रकल्प आम्हाला पारंपरिकपणे विविधतेचा अभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये कृष्णवर्णीयांच्या मालकीच्या एकापेक्षा जास्त रेस्टॉरंट्सचा आणि व्यवसायांचा परिचय करून देण्यासाठी मदत करण्याची संधी देतो.
ही पॉप-अप्सद्वारे समर्थित रेस्टॉरंट्स कृष्णवर्णीय लोकांच्या मालकीच्या महामारीचा परिणाम झालेल्या केवळ मोजक्याच व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात. आम्हाला अशा प्रकारच्या व्यवसायांना फक्त या कालावधीतच नव्हे तर भविष्यातही सहाय्य करायचे आहे.
नेव्ही यार्डमध्ये आम्ही सहाय्य करत असलेल्या उत्कृष्ट रेस्टॉरंट्सना भेट द्या.
आमच्या प्रभाव कार्याबद्दल अधिक वाचा
कृष्णवर्णीयांच्या व्यवसायांना जगभरात सहाय्य करत आहोत.
जगभरातील ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी सहाय्य करत आहोत.
याच्या विषयी